सनय प्रकाशनाची सुरुवात तळागाळातील लेखकांना व वाचकांना हक्काचे विचारपीठ असावे या उद्देशाने २०१२ साली झाली. डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या ‘शिवराय शिक्षण आणि संस्कार’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी कवी परमानंद यांनी शिवभारत या ग्रंथात लावलेले ‘सनय’ हे विशेषण घेवून डॉ. लहू गायकवाड व डॉ. मिलिंद कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. वंदना शिंदे व श्री. शिवाजी राजू शिंदे यांनी सनय प्रकाशनाची स्थापना केली. डॉ. लहू गायकवाड व डॉ. मिलिंद कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक आणि प्रकाशनातील सर्व सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून ही प्रकाशन घराघरात व वाचकांर्पंत पोहोचत आहे.
सामजिक भान आणि जाणिव या ध्येयाने प्रकाशनाने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील घराघरात दुर्लक्षित राहिलेलेली अनेक पुस्तके पोहोचवण्याचे मोठे जाळे निर्माण केले. प्रकाशनाला असलेले सामाजिक जाणिवेचे भान या मध्यातून पुरोगामी चळवळीसाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य, पुस्तके वाचकापर्यंत पोहोचवण्याचे ध्येय प्रकाशनाच्या समोर आहे. त्यातून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिराव व क्रांतीजोति सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत तुकाराम महाराज, संत गाडगेबाबा, अण्णाभाऊ साठे आणि समस्त बहुजन नायकांचे विचार घराघरात जाण्यासाठी सनय प्रकाशन कटीबद्ध आहे. वाचकांपर्यंत सकस वैचारिक आशयसंपन्न साहित्य पोहोचवण्यासाठी विविध विषांयावरील पुस्तके सनय प्रकाशनाच्या पुस्तक दालनात असून त्यात कथा, कादंबरी, वैचारिक, वैज्ञानिक, अंधश्रद्धा निर्मूलन करणारी, ऐतिहासिक व पर्यावरण, ललित वाङ्मय व अभ्यास क्रमातील क्रमिक पुस्तके आपल्याला येथे उपलब्ध होतील. नवे विषय आणि नवे लेखक या विषयी सनय प्रकाशन नेहमी स्वागतशील आहे. नव्या विषयांना व लेखकांना घराघरात पोहोचवण्यासाठी प्रकाशन अथक प्रयत्नशील आहे. वाचकांच्या वाढत्या मागणीतून महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेली अनेक महत्त्वाची पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध होत नसल्याने सरकारी पुस्तक दालन प्रकाशनाने वेबसाईटवर समाविष्ट केलेले आहे. तसेच वेगळा आशय व विषय असलेली अनेक पुस्तके भरपूर सवलतीच्या दरात या दालनात वाचकांना घरपोहोच देण्याचा एक अभिनव उपक्रम प्रकाशन संस्थेने राबवलेला आहे.