८६५२१२१९१२Help
sanaybook23@gmail.com
Sale!

Lokmata Ahilyabai Holkar

20.00 18.00

पुस्तकाचे नाव

लोकमाता अहिल्यादेवी होळकर

लेखक

भाषा

पुस्तक बांधणी

पानांची संख्या

आकार

५.५ * ८.५ इंच

वजन

५४ग्रॅम

Description

भारतातील अभ्यासक तत्वनेते, चरित्रलेखक, इतिहासकार, राजकीय विश्लेषक, भाष्यकार, ज्ञानवंत, विचारवंत भारतीय मातीत जन्मलेल्या हजारो नवरत्नांकडे डोळेझाक करतात आणि पाश्चिमात्य राष्ट्रांमधून व विशेषतः युरोपच्या राजकीय इतिहासामधून मानवतेची व लोकशाहीची बीजे शोधतात. यामध्ये त्यांचा अहंकार आहे. अंधानुकरण आहे कि, वर्णजातश्रेष्ठत्वाचा पीळ आहे हे समजणे अवघड आहे. अहिल्यादेवी या भारतीय इतिहासास मिळालेली प्रचंड मोठी देणगी आहे. त्यांचे प्रजाहितकार्य जगातील नामवंत अशा पौर्वात्य व पाश्चिमात्य अभ्यासकांनी वाखाणले आहे. अठराव्या शतकात युरोप – रशियामधील राजकीय, आर्थिक, औद्योगिक क्रांत्यांचा आधारही आपल्याला अहिल्यादेवींच्या राज्यपद्धतीत सापडतो. अठराव्या – एकोणिसाव्या शतकातील युरोपमधले प्रगत समजले जाणारे राज्य ब्रेड -बटरसाठी एकमेकांचा जीव घेत असताना भारतातील होळकर राज्यात गोर-गरिबांसाठी, अनाथांसाठी अन्न, छत्रे मोफत व रात्रंदिवस सुरु होते. मागेल त्याला काम होते. न्यायासाठी कोणालाही मध्यस्थांशिवाय चोवीस तास बारा महिने अहिल्यादेवींच्या महेश्वर दरबारी प्रवेश होता. परदेशी इतिहासकार व चरित्रकारांच्या मते, भारतातील राजांनी अहिल्यादेवींचे अनुकरण करून जर रयत व राज्य राखले असते तर भारतावर कधीही पारतंत्र्य आले नसते. एवढेच नव्हे तर पेशव्यांची मुजोरीही वाढली नसती. दुर्दैवाने होळकर संस्थांनचे वंशजही अहिल्यादेवींनी घालवून दिलेली शिस्त पाळू शकले नाहीत.
अशा या थोर राज्यकर्त्या म्हटल्यापेक्षा लोकमाता अहिल्यादेवींवर परदेशी लेखक-लेखिका-कवींनीं विपुल लेखन इंग्रजी-फ्रेंच भाषांमधून केलेले आहे. स्कॉटल्यांडमधील कवियित्री जोना बेली यांनी दीर्घ काव्य रचले आहे. त्यातील चार ओळी अशा आहेत.
FOR THIRTY YEARS HER REIGN OF PEACE
THE LAND IN BLESSINGS DID INCREASE !
AND SHE WAS BLESSED BY EVERY TONGUE…
BY STERN AND GENTLE ; OLD AND YOUNG !

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Lokmata Ahilyabai Holkar”

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
आपणास काही मदत हवी आहे का ?